TET Exam 2026: TET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा केंद्रावर लागू झाले नवे नियम

TET Exam 2026 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा अधिक कडक नियमांसह घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर जाताना नवीन नियमांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे. (TET New Rules)

हे आहेत नवीन नियम 


यंदाच्या परीक्षेत उमेदवारांना बुरखा, मास्क, टोपी, दुपट्टा किंवा चेहरा झाकणारी कोणतीही वस्तू घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा आणि चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे उमेदवारांची पडताळणी केली जाणार असल्याने चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक राहणार आहे.



परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना किंवा मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. मूळ ओळखपत्र नसल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

कायदेशीर कारवाई केली जाणार..


परीक्षा केंद्रावर उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी, फेस रिकग्निशन आणि मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे. संशयित उमेदवारांची आधार पडताळणीही केली जाऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीने परीक्षेला बसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा प्रथमच प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि QR कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. तसेच उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत प्रत्यक्ष सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करणेही आवश्यक असेल.



परीक्षा केंद्र आणि परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, स्मार्टवॉच किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

दिव्यांग उमेदवारांसाठीही नियम बदलण्यात आले आहेत. लेखनिक म्हणून कुटुंबातील सदस्य नेण्यास परवानगी नसून त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी सर्व नियमांचे पालन करूनच परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०