Nutrition Food : लहानग्यांच्या जीवाशी खेळ! शालेय पोषण आहारात मृत बेडूक

ग्रामस्थांनी विचारला प्रशासनाला जाब


पंढरपूर : मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषण आहार (Nutrition Food) पुरवला जात आहे. मात्र शालेय पोषण आहारात सातत्याने अळ्या, किडे, झुरळ, उंदराच्या लेंड्या अशा धक्कादायक गोष्टी आढळत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली येथील गर्भवती महिला व बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात मृत वाळा सापाचं पिलू आढळलं होतं.


या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी अशीच एक घटना पंढरपूर (Pandharpur News) येथे घडली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या शाळेत एक किळसवाणा आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसे नगर येथील अंगणवाडीमध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क बेडकाचे मृत पिल्लू (Dead Baby Frog) सापडले आहे. या धक्कादायक घटनेमुळे लहानग्या जीवांशी शासनाचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, शालेय पोषण आहारात अशाप्रकारे मेलेला प्राणी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांतून याआधीदेखील असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला का? असा प्रश्न पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेतून दिसत आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,