Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीElvish Yadav : 'या' प्रकरणामुळे एल्विशच्या मागे पुन्हा ईडीचा फेरा!

Elvish Yadav : ‘या’ प्रकरणामुळे एल्विशच्या मागे पुन्हा ईडीचा फेरा!

मुंबई : यूट्यूबर (Youtuber) आणि बिग बॉस ओटीटी २ (Big Boss OTT 2) चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ ​एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी ​एल्विशने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाची नशा केल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यावेळी काही तासाच्या चौकशीनंतर त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. कोठडीकाळ पूर्ण झाल्यानंतर तो जामीनावर सुटून बाहेर आला होता. मात्र त्याच्यावरील हे संकट अद्यापही टळले नसल्याचे दिसून येत आहे. पार्टीत नशा म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याने ईडीने एल्विश यादवला पुन्हा फेरा मारला आहे. मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात ईडीने एल्विशला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ​​एल्विश यादवला मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे २३ जुलै रोजी एल्विशला चौकशीसाठी लखनऊला जावे लागणार आहे. यापूर्वी ईडीने ८ जुलै रोजी नोटीस बजावली होती. मात्र एल्विशने परदेशात असल्याचे कारण देऊन काही दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानंतर ईडीने १५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.

दरम्यान, चौकशी दरम्यान ईडी एल्विशच्या मालकीच्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबत मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसच्या मालकांचीही चौकशी करणार असल्याचे समजत आहे. रेव्ह पार्ट्यांसाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याचे अनेक आरोप एल्विशवर आहेत. त्यामुळे सध्या जामिनावर बाहेर असणाऱ्या एल्विशवर ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -