विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात ४९ शाळा अनधिकृत

जिल्हा प्रशासनाकडून कारवाई, संबंधित शाळांना बजावल्या नोटीस


पुणे : विद्येचे माहेरघर तसेच शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात ४९ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ४९ शाळा इंग्लिश माध्यमांच्या असून पुणे शहर आणि ग्रामीण भागातील ४५ शाळा या बेकायदेशीर आहेत तर ४ शाळा या नियमबाह्य पद्धतीने चालत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या शाळांवर कारवाई करत त्या शाळांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत ट्रान्स्फर केले जाणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.


पुणे शहर तसेच जिल्ह्यातील ४९ अनधिकृत शाळा या इंग्लिश माध्यमांच्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वेक्षण केले जात असून ज्या शाळांना मान्यता नाही. त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येत आहे. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून ४५ शाळा या बेकायदेशीर आहेत तर ४ शाळा नियमबाह्य आहेत. ज्या शाळांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यांनी जर नोटीस बजावल्यानंतरही शाळा सुरू ठेवल्या तर शाळेला प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यानंतर जर शाळा सुरू राहिली तर प्रतिदिन १० हजार रुपये असा दंड केला जाणार आहे. एवढेच नव्हे जर कारवाई करुन सुद्धा शाळा बंद केल्या नाहीत तर फौजदारी गुन्हा देखील दाखल होणार असल्याची माहिती संतोष पाटील यांनी यावेळी दिली.


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ज्या अनधिकृत शाळा आहेत, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत ट्रान्स्फर केले जाणार आहे. तसेच ज्या पालकांनी फी भरली आहे, त्यांच्या पाल्यांना शासकीय शाळांमध्ये पाठविण्यात येणार आहे. ज्या ४९ अनधिकृत शाळा आहेत, त्यात पिंपरी चिंचवड विभागातील ११, पुणे महापालिकेच्या हद्दीतील ४ आणि जिल्हा परिषदेच्या विभागातील ३४ शाळा असून या सर्व शाळा या इंग्रजी माध्यमातील असल्याचे यावेळी संतोष पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे