रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही

  120

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती


मुंबई : आमदार नितेश राणेंसह अन्य भाजप नेत्यांच्या विरोधात धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण त्यांनी भाषणात वापरलेले 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' हे शब्द भारतीयांच्या किंवा येथे असलेल्या समाजाच्या भावना दुखावू शकत नाहीत,अशी माहिती पोलिसांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.


नितेश राणे यांनी केलेल्या भाषणातून धार्मिक गटांमध्ये वैर आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर चार गुन्हे दाखल केले आहेत. मानखुर्द पोलिस ठाण्यात नितेश राणे यांच्यावर आयपीसी २९५ (ए)अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र,अन्य प्रकरणांत हे कलम लावू शकत नाही, अशी माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाला दिली.


पोलिस आयुक्तांनी राणे यांची भाषणे ट्रान्सक्राईब केली. त्यात राणे यांच्यावर २९५ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही,असा निष्कर्ष पोलीस आयुक्तांनी काढला आहे, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. भाषणात 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' असा उल्लेख आहे. कायद्यातील तरतूद भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आहे. 'रोहिंग्या' व 'बांगलादेशी' हे भारतीय नाहीत आणि त्यांनी देशात बेकायदा प्रवेश केला आहे. त्यामुळे हे शब्द भारतीयांच्या भावना दुखावणारे नाहीत, असा युक्तिवाद वेणेगावकर यांनी केला. पोलिस आयुक्तांनी भाषण तपासले असून सरकारी वकिलांचे म्हणणे आम्ही मान्य करतो, असे खंडपीठाने म्हटले.


आयपीसी कलम १५३ (ए)आणि १५३(बी)(धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व आणि असंतोष वाढविणे) अंतर्गत आरोपींवर खटला चालविण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी आठ आठवड्यांच्या आत पोलिस घेतील, असेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला