Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी


पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस (Mumbai rain) पडत होता. मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले. आता हळूहळू रेल्वेसेवा पूर्ववत होऊ लागली आहे. मात्र, अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यांतील खड्ड्यांनी एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. पालघरमध्ये रस्त्यातील खड्ड्यात एक दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकीवरील महिलेच्या हातातील दीड वर्षांचे बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच वेळी सर्वत्र हळहळ तर प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर-नवापूर रोडवर ही घटना घडली. आई-वडिलांसोबत हा चिमुकला बाजारपेठेत जात असताना पावसाचे पाणी साचून तुडुंब भरलेल्या खड्ड्यात बाईक आदळल्याने हा अपघात घडला. खड्ड्यात पडताच आईच्या हातातून बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माहीर मोशीन शिवानी असं या चिमुकल्याचं नाव आहे.


या घटनेमुळे पालघरमध्ये संतप्त वातावरण आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं.


मुसळधार पावसामुळे आज सकाळीच एक महिला धावत्या ट्रेनमधून पडल्याचे वृत्त समोर आले होते. या महिलेचा जीव वाचला परंतु तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले. पावसाच्या हाहाकाराने झालेल्या या दोन घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०