Nashik news : धक्कादायक! खेळताना दोन वर्षांचा चिमुकला दुसऱ्या माळ्यावरील बाल्कनीतून पडला

काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


नाशिक : नाशिकच्या (Nashik news) सिडको परिसरातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. दोन वर्षांचा चिमुकला खेळता खेळता दुसऱ्या माळ्यावरील बाल्कनीतून पडला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने चिमुकल्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा परिसरात ही घटना घडली. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करिम शेख (वय २ वर्ष) असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


करिम हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. त्यावेळी करिमची आई घरकामात होती. दरम्यान, गॅलरीत खेळत असलेला करिम खेळता खेळता अचानक रेलिंगवर पकडून उभा राहिला. त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळला. काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक धावत आले. करिम जखमी अवस्थेत पडल्याचे दिसताच नागरिकांनी ताबडतोब त्याला उचलून हॉस्पिटल गाठले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अंबड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.


Comments
Add Comment

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

मुलीचे नाव घेऊन बोलावले आणि काटा काढला

पुणे : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलाचे नाव अमरसिंह गचांड असून,