Akola news : भयंकर! शाळेतील आचाऱ्याने ९ वर्षीय विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग

अकोला जिल्हापरिषद शाळेतील धक्कादायक प्रकार


अकोला : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक चित्रविचित्र घटना सातत्याने समोर येत असतात. त्यातच आता अकोल्याच्या जिल्हापरिषद शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालेय पोषण आहार बनवणाऱ्या एका ५२ वर्षीय कर्मचाऱ्याने शाळेतील ९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अकोला पोलिसांनी आरोपीविरोधात बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. चंद्रमणी (वय ५२) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील एका प्राथामिक शाळेत पोषण आहार बनवण्याचे काम करणाऱ्या आरोपी चंद्रमणीने शाळेतील पीडित विद्यार्थिनीला खिचडी देण्याचं अमिष दाखवून एका खोलीत नेलं. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. ती सलग दोन-तीन दिवस शाळेतच गेली नाही. मुलगी शाळेत जात नसल्याने आईने तिला याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईजवळ कथन केला.


मुलीने सांगितलेला प्रसंग ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने शाळेत धाव घेऊन याबाबत मुख्याद्यापकांना जाब विचारला. प्रकरण शाळेत पोहोचल्याचं कळताच आरोपी चंद्रमणी याने तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.


तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शालेय पोषण आहार मदतणीस म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीनेच विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू बाबा अशोक खरातची केस लढवण्यास सरकारी वकिलाचा नकार

मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात

Chief Minister's Employment Creation Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाकडे नेणारी प्रभावी वाटचाल

मुंबई: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील

समृद्धी महामार्गावर आठ महिलांचा अपघाती मृत्यू

मुंबई : समृद्धी महामार्गावर जालना परिसरात भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मजूर महिलांचा

जळगाव : सोन्याचा भाव दीड लाखांच्या उंबरठ्यावर

गेल्या 24 तासांत सोन्याचे दर 3,500 रुपये वाढले चांदीच्या भावातही 3,000 रुपयांची झाली वाढ जळगाव : सोन्या-चांदीच्या

केळीच्या दरात मोठी घसरण, शेतकरी वर्ग हवालदिल

जळगाव : केळी उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यासह परिसरात यंदाच्या हंगामाची

पुणे - वाहन क्रमांक आरक्षणासाठी २ एप्रिलपासून फेसलेस सेवा सुरू

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची