Pune News : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मोठ्या पटीने वाढ

जाणून घ्या सध्याची टक्केवारी


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. पुण्यातील खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पातील चार धरणांमध्ये केवळ ३.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची (Water Shortage) टांगती तलवार होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार होता. परंतु अनेक दिवसांपासून पुण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. मात्र आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस पडला आहे. त्यामुळे या क्षेत्रात एकूण पाच टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच एकूण दीड टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे समोर आले. यामुळे चारही धरणांमध्ये मिळून शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. सध्या धरण क्षेत्रात ४.९९ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे


राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण राज्याला पाणीसंकटाला सामोरे जावे लागले होते. परंतु यंदा पावसाने वेळेआधीच राज्यभरात चांगलीच हजेरी लावल्यामुळे पाणीकपातीच्या संकाटांना सामोरे जावे लागणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग