Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या 'या' विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय


मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता राज्यातील ईडब्ल्यूएस (EWS), एसईबीसी (SEBC) आणि ओबीसी (OBC) विद्यार्थिनींसाठी नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली आहे.


व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना यापूर्वी सरकारने ५० टक्के शिक्षण शुल्क मंजूरी देण्यात आली होती. परंतु आता या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के माफी देण्यात आली आहे. २०२४-२५ पासून ही योजना लागू होणार असून याचा फायदा राज्यातील २ लाखांहून अधिक मुलींना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थिनींच्या कुटुंबांचे प्रतिवर्ष उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे.


दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचा समावेश वाढवण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय मदत करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासोबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आणखी काही महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या