छत्रपती संभाजीनगर : एका वयोवृद्ध व्यक्तीला काही तरुणांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक (Sambhajinagar News) प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे. याठिकाणी एका वयोवृद्ध भिकाऱ्याची काही तरुणांसोबत बाचाबाची झाली होती. मात्र या वादामुळे तरुणांनी त्या वृद्ध व्यक्तीवर चक्क पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. किरकोळ वादाचे रुपांतर जीवघेणा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील शंभूनगर येथील शहाणूर मिया दर्गा परिसरात असणाऱ्या त्रिशरण चौकात तीन तरुणांनी एका ५७ वर्षांच्या भिकारी व्यक्तीला जिवंत जाळण्याचे थरारक कृत्य केले आहे. या घटनेमध्ये वृद्ध व्यक्ती गंभीररित्या भाजली असून त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याच्या आधारे संभाजीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील शहाणूर मिया दर्गा परिसरात असणाऱ्या त्रिशरण चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ३ तरुणांनी एका ५७ वर्षांच्या भिकारी व्यक्तीला जिवंत पेटवून दिले. या घटनेमध्ये महिपालसिंग रणधीरसिंग गौर हे ३५ टक्के भाजले असून त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. शहाणूर मिया दर्गा परिसरात राहणाऱ्या एका भिकारीला गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन तरुणांनी ‘तू माझ्या परिसरात राहायचे नाही, इथून निघून जा’ अशी धमकी दिली. मात्र भिकाऱ्याने त्यांचे ऐकले नसल्यामुळे रागाच्या भरात तरुणांनी या व्यक्तीच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकले. त्यानंतर त्यांच्या अंगावर जळती माचिसची काडी फेकली. अंगावर पेट्रोल टाकल्यामुळे छोट्याशा काडीने आगीचा पेट घेतला व जोरदार आग भडकल्यामुळे महिपालसिंग नामक जखमी व्यक्ती ३५ टक्के भाजून गेले.
दरम्यान, परिसरातील व्यक्तींनी तातडीने जखमी व्यक्तीला घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संभाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले आहे. आदिल शेख, कृष्णा शिंदे आणि शेख अयाज अशी आरोपींची नावे आहेत. या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…