Raigad Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात!

९ विद्यार्थी जखमी


रायगड : आज सकाळी कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) हातकणंगले येथे सोलापूरहून कणकवलीला जाणाऱ्या एसटीला दुचाकीची जोरदार धडक झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये दोन तरूण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताची घटना ज्वलंत असताना आता आणखी एक अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. रायगडमध्ये (Raigad News) विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र या भीषण अपघातामुळे विद्यार्थ्यांसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर कुडपण रस्त्यावर एसटी बसला भीषण अपघात झाला. या एसटी बसमधून जवळपास तीस विद्यार्थी प्रवास करत होते. मात्र पावसादरम्यान रस्त्यामध्ये पडलेल्या खड्डयात जोरदार बस आदळल्यामुळे कुडपण मार्गावर क्षेत्रपाळ गावच्या हद्दीत हा अपघात घडला. बसमधून प्रवास करणाऱ्या तीस विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेले असून जखमींना किरकोळ आणि मुकामार लागला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


दरम्यान, महाराष्ट्रात सध्या अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात रायगड येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातामुळे यावर प्रशासन काय उपाय करणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून