Kolhapur News : कोल्हापुरात खुलेआम देहविक्री! शिवसैनिकांनी वेळीच रोखला धक्कादायक प्रकार

लॉज आणि पोलिसांच्या जीपमध्ये लपून बसलेल्या महिलांचा उधळला डाव


मध्यरात्री केले उग्र स्वरूपाचे आंदोलन


कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostitution) थाटण्याचे प्रकार समोर येत होते. अशातच कोल्हापुरमधून (Kolhapur News) रात्रीच्या वेळी खुलेआम वेश्याव्यवसाय (Illegal Woman Workers) सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर आता कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असणारा खुलेआम वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिवसैनिकांनी (Eknath Shinde Shiv Sena) मध्यरात्री आक्रमक भूमिका (Shiv Sena Group Protest) घेतली. त्यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व तृतीयपंथीयांना पिटाळून लावले. मात्र या सर्व प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील विविध चौकांमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू होता. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदेही सुरु असल्याची माहिती समोर आली होती. हा सर्व प्रकार पाहता व्हीनस कॉर्नर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी (Illegal Woman Workers) करत मध्यरात्री अचानक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.


आंदोलनादरम्यान, वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला व्हीनस कॉर्नर परिसरातील विविध लॉजमध्ये लपलेल्या होत्या. तर काही महिला स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन लपल्या होत्या. परंतु शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने वेळीच छापा टाकल्याने सर्व प्रकार उघडकीस आला आणि या प्रकारात असणाऱ्या सर्व महिलांना अटक करण्यात आली आहे.



'हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है'


वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना 'हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है' असा शिवसैनिकांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी हे आंदोलन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केले. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी, मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

महत्वाच्या हॉस्पिटॅलिटी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका मुंबई : राज्यातील

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी मुंबई : नवी दिल्ली

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला