Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीKolhapur News : कोल्हापुरात खुलेआम देहविक्री! शिवसैनिकांनी वेळीच रोखला धक्कादायक प्रकार

Kolhapur News : कोल्हापुरात खुलेआम देहविक्री! शिवसैनिकांनी वेळीच रोखला धक्कादायक प्रकार

लॉज आणि पोलिसांच्या जीपमध्ये लपून बसलेल्या महिलांचा उधळला डाव

मध्यरात्री केले उग्र स्वरूपाचे आंदोलन

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostitution) थाटण्याचे प्रकार समोर येत होते. अशातच कोल्हापुरमधून (Kolhapur News) रात्रीच्या वेळी खुलेआम वेश्याव्यवसाय (Illegal Woman Workers) सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर आता कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असणारा खुलेआम वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिवसैनिकांनी (Eknath Shinde Shiv Sena) मध्यरात्री आक्रमक भूमिका (Shiv Sena Group Protest) घेतली. त्यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व तृतीयपंथीयांना पिटाळून लावले. मात्र या सर्व प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील विविध चौकांमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू होता. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदेही सुरु असल्याची माहिती समोर आली होती. हा सर्व प्रकार पाहता व्हीनस कॉर्नर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी (Illegal Woman Workers) करत मध्यरात्री अचानक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान, वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला व्हीनस कॉर्नर परिसरातील विविध लॉजमध्ये लपलेल्या होत्या. तर काही महिला स्वत:चा बचाव करण्यासाठी पोलिसांच्या जीपमध्ये जाऊन लपल्या होत्या. परंतु शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने वेळीच छापा टाकल्याने सर्व प्रकार उघडकीस आला आणि या प्रकारात असणाऱ्या सर्व महिलांना अटक करण्यात आली आहे.

‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना ‘हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’ असा शिवसैनिकांनी इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी हे आंदोलन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केले. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -