मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५ टक्के अधिक खर्च करावे लागतील. कंपनीच्या नव्या प्लानच्या किंमतींची घोषणा गेल्या आठवड्यात कऱण्यात आली होती. आजपासून हे नवे दर लागू होत आहेत.
जर तुम्हीही जिओ युजर्स आहात तर जुन्या किंमतीच्या तुलनेत नव्या प्लानच्या किंमतीत किती अंतर आहे हे जाणून घेऊया…
१५५ रूपयांच्या प्लानची किंमत वाढून १८९ रूपये झाली आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. जिओच्या २०९ प्लानची किंमत वाढून आता २४९ रूपये झाली आहे. यात दिवसाला १ जीबी डेटा मिळतो.
२३९ रूपयाच्या प्लानची किंमत वाढून २९९ रूपये करण्यात आली आहे. २९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३४९ रूपये करण्यात आली आहे. ३४९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून ३९९ रूपये करण्यात आली आहे. तर ३९९ रूपयांच्या प्लानची किंमत ४४९ रूपये करण्यात आली आहे. या सर्व प्लान्सची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.
४७९ रूपयांच्या प्लानची किंमत ५७९ रूपये झाली आहे. यात १.५ जीबी डेटा मिळतो. ५३३ रूपयांच्या प्लानची किंमत ६२९ रूपये झाली आहे. यात २ जीबी डेटा मिळतो.
जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या प्लानची आधीची किंमत ३९५ रूपये होती. याची किंमत आता वाढून ४७९ इतकी झाली आहे. यात ६ जीबी डेटा मिळतो.
१५५९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून १८९९ रूपये झाली आहे. यात एकूण २४ जीबी डेटा मिळतो. २९९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३५९९ रूपये करण्यात आली आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…