Chhatrapati Sambhajinagar News : विद्यार्थ्यांवर जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ!

शाळेची दुरावस्था पाहून पालकांचा तीव्र संताप


छत्रपती संभाजीनगर : सध्या अंगणवाडीतील (Anganvadi) लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात (Nutritious Food) किडे, अळ्या, लेंड्या सापडत आहेत. अशा प्रकारचा पोषण आहार देऊन सरकार (Maharashtra Government) मुलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. सातत्याने पोषण आहारासंबंधी अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येताना आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील शाळेची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. शाळेची परिस्थिती डबघाईला आली असल्यामुळे विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असणाऱ्या गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड दुरावस्था झाली असून येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या ४ वर्षांपासून इंग्रजी व २ वर्षांपासून गणित विषयासाठी याठिकाणी शिक्षकच नसल्याने पालक अन् विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.



शाळेची परिस्थिती डबघाईची


खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या शाळेत गल्लेबोरगाव सह आसपासच्या ८ ते १० गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या शाळेतील खोल्यांना तडे गेले तर काही खिडक्या आणि दरवाजे मोडकळीस आले आहेत. शाळेतील खोल्यांची पावसाळ्यात गळती होत असून हे छत केव्हाही कोसळू शकेल. अशा धोक्याच्या वातावरणात जवळपास ५९६ विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या दयनीय अवस्थेकडे जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह आता पालक वर्गही चिंतेत पडला आहे.


दरम्यान, कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. मात्र छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुर्दम्य परिस्थिती पाहता या सगळ्या प्रकाराकडे प्रशासन लक्ष देऊन याची गांभीर्याने दखल घेणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या