मुंबई : महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट स्टेटस ठेवणे असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढू लागले आहेत. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची कोणत्याही व्यक्तीने विटंबना करू नये. आपले आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पहाणारे जिहादी विचाराचे जे लोक आहेत त्यांना अद्दल घडावी यासाठी विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात सरकारने कडक कायदा अमलात आणावा, अशी मागणी कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते काल रस्त्यावर उतरलेले होते. याला कारण हडपसरला अशी घटना घडली, जिथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर एका जिहादी विचाराच्या तरुणाने जाऊन दगडफेक केली. तो पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात जागो-जागी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला हिंदुत्ववादी विचाराचे तरुण रस्त्यावर उतरले. संतापले होते. कारण महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबना करण्याचे प्रकार महाराष्ट्र राज्यामध्ये वाढले आहेत. महापुरुषांच्या विरोधात स्टेटस ठेवण्याचे स्टेटस ठेवण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. या सर्वाला कायद्याने आळा घालता येईल, अशी आग्रही भूमिका आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…