Indian Army : नदीची पातळी वाढल्याने भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात!

दुर्घटनेत ५ जवान शहीद


लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) रणगाड्याला (Tank) मोठा अपघात झाला आहे. लेह जिल्ह्यातील मंदिर मोरजवळ टँकचा अपघात झाला असून या दुर्घटनेत ५ जवान शहीद झाले आहेत. नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने टँकला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात झाला. काल याठिकाणी युद्ध सराव सुरू होता. यावेळी रणगाडे नदी ओलांडत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ही दुर्घटना घडली. या रणगाड्यांमध्ये अडकून पाच जवान शहीद झाले.


दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. या भागात अभ्यास दौरा सुरू होता. भारतीय सैन्यदलाचे अनेक टँक्स याठिकाणी आले होते. आज नदी पार करत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे रणगाडा अडकला, ज्यामध्ये असलेले पाच जवान शहीद झाले. या घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.


दरम्यान, या अपघाताच्या वेळी रणगाड्यामध्ये लष्कराचे पाच जवान उपस्थित होते. यामध्ये एक जेसीओ आणि चार सैनिकांचा समावेश आहे. एक जवान सापडला आहे, तर उर्वरित चार जवानांचा शोध सुरू आहे. दौलत बेग ओल्डी येथे ज्या रणगाड्याला अपघात झाला तो भारतीय लष्कराचा T-72 टँक होता.

Comments
Add Comment

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर