
मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स ६०० रूपयांपर्यंत महाग केले आहेत. नव्या किंमती ३ जुलैपासून लागू होणार आङेत. कंपन्यांनी एक अथवा दोन रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत बदल केलेले नाहीत तर संपूर्ण पोर्टफोलिओ अपडेट केला आहे.
अशातच ग्राहकांसमोर एक मोठे आव्हान आहे आपल्या रिचार्ज प्लान्सबद्दल. जिओ आणि एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, प्रीपेड युजर्सकडे ३ जुलैच्या आधी एक खास संधी आहे.
काय करू शकतात युजर्स?
जर तुम्ही कमी किंमतीत आपली सर्व्हिस अॅक्टिव्ह ठेवत आहात तर तुम्ही अॅडव्हान्समध्ये रिचार्ज करू शकता. म्हणजेच तुम्ही सध्याचा प्लान संपण्याआधी नवा रिचार्ज करू शकता. मात्र यानंतर अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की या स्थिती तुम्हाला पूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल का?
म्हणजेच जुन्या आणि नव्या दोन्ही प्लान्सच्या संपूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल. एअरटेलने हे ही म्हटले आहे की ७३० दिवसांच्या वर व्हॅलिडिटीसाठी हे नियम लागू होणार नाहीत.
जिओ आणि एअरटेल दोघांनी आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओचा महिन्याचा प्लान आता १८९ पासून सुरू होईल. हा प्लान आधी १५५ रूपयांना होता. हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येतो.