Nashik Accident : नाशिकमध्ये रुग्णवाहिकेची तीन गाड्यांना धडक!

Share

रुग्णवाहिकेत दारुच्या बाटल्या आढळल्याने उडाली खळबळ

नाशिक : नाशिकमधून आज सकाळीच एक विचित्र अपघाताची घटना (Nashik Accident) समोर आली. यात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने समोरुन येणाऱ्या महिलेच्या कारला धडक दिली. इतकंच नव्हे तर मदतीसाठी आलेल्या नागरिकांवरही त्याने दमदाटी केली. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओझरजवळ (Ozar) एका खासगी रुग्णवाहिकेने (Ambulance) तीन वाहनांना धडक दिली. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचं नाव आणि फोटो होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-धुळे महामार्गावर (Nashik-Dhule Highway) ओझरजवळ खासगी रुग्णवाहिकेने तीन वाहनांना धडक दिली. यात एका सरकारी रुग्णवाहिकेसह दोन वाहनांचा समावेश आहे. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, यात एक खळबळजनक माहितीही समोर आली आहे. सदर रुग्णवाहिकेत दारूच्या बाटल्या आढळून आल्या. शिवाय रुग्णवाहिका चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

46 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago