T-20 world cup 2024: द. आफ्रिकेची फायनलमध्ये दणक्यात एंट्री, अफगाणिस्तानला चारली पराभवाची धूळ

मुंबई: दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानला पराभवाची धूळ चारत दणक्यात टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनलमध्ये एंट्री घेतली आहे. आफ्रिकेला विजयासाठी अवघ्या ५७ धावांची आवश्यकता होती. आफ्रिकेने हे आव्हान ८.५ इतक्या षटकांत पूर्ण केले. यादरम्यान आफ्रिकेने केवळ एक विकेट गमावली.


अफगाणिस्तानने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदीजाचा निर्णय घेतला खरा मात्र त्यांच्यासाठी तो चुकीचा निर्णय ठरला. आफ्रिकेने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा डाव अवघ्या ५६ धावांवर आटोपला.अफगाणिस्तान संघाचा पहिला विकेट रहमानुल्लाह गुरबाजच्या रूपात पडला. तो ४ धावांवर बाद झाला. यानंतर गुलबदिन नायब, इब्राहिम जादरान, मोहम्मद नबी आणि नांगेयालिया खरोटेही स्वस्तात बाद झाले. अफगाणिस्तानकडून अझमतुत्लाह ओमरझाईने सर्वाधिक १० धवा केल्या. तर फलंदाज तर दुहेरी धावाही करू शकले नाहीत.


आफ्रिकेकडून मॅक्रो जेन्सन आणि तबरेज शम्सी यांनी जबरदस्त गोलंदाजी करताना प्रत्येकी ३ विकेट घेत अफगाणिस्तानच्या डावाला सुरूंग लावण्याचे मोठे काम केले. तर कॅगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टे यांनी प्रत्येकी २ घेतल्या.



आफ्रिकाने रचला इतिहास


हा सामना जिंकताच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहास रचला. आफ्रिकेचा संघ अद्याप कोणत्याही आयसीसी वर्ल्डकप च्या इतिहासात फायनलपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. यासोबतच त्यांच्यावर चोकर्स हा मोठा डाग पडला होता. हा डागही दूर झारा आहे. याआधी आफ्रिकेचा संघ अनेकदा सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. आफ्रिकेच्या संघाने याआधी वनडे वर्ल्डकपमध्ये ५ वेळा सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली होती. तर टी-२० वर्ल्डकपमध्ये २ वेळा सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले होते.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना