Pune Underground Metro : आनंदवार्ता! गणेशोत्सवात पुणेकरांना मिळणार स्वारगेटपर्यंत मेट्रोसेवा

  73

पुणे : मुंबईनंतर आता लवकरच पुण्यातही अंडरग्राऊंड मेट्रो (Pune Metro) धावणार आहे. येत्या गणेशोत्सवाआधीच (Ganeshotsav) ही मेट्रोसेवा पुणेकरांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट (Swargate) या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैअखेरीस ते पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हे काम पूर्ण करावे असे महामेट्रोने नियोजन केले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पुणेकरांचा उत्साह आणखी वाढणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याची वाहतूक कोंडी पाहता महामेट्रो संचालकांनी पुण्यात अंडरग्राऊंड मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले असून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असणार आहेत. ३.६४ किलोमीटरचा हा भुयारी मार्ग जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावणार आहे. तर या मार्गाचे काम जुलैअखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे, अशी माहिती मिळत आहे.


मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना तपासणीसाठी बोलविण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रोकडून राज्य सरकारकडे ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात या मार्गावर सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यास ही सेवा सुरू होणे लांबणीवर पडू शकते, असे सूत्रसंचालकांनी म्हटले आहे.



मध्यवर्ती भागात भाविकांची सोय


शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागात मानाचे गणपती आहेत. या गणपतींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे. मध्यवर्ती भागात गर्दीमुळे भाविकांना वाहनाने जाणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी भाविक मेट्रोच्या सहाय्याने जाऊ शकणार आहेत.

Comments
Add Comment

मुलांची मज्जा! ८ आणि ९ जुलैला राज्यातील सर्व शाळांना सुट्टी! पण कारण काय?

मुंबई : राज्यातील सर्वच शाळांना येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारच्या

राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू

मुंबई: गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई: तळेगाव-दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना पिस्तुल व जिवंत काडतुसांसह पकडले. चौकशीनंतर या

पुणे लैंगिक छळ: मोठा खुलासा , तक्रार खोटी!

पुणे: काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तरुणीचा लैंगिक छळ केल्याची

पनवेल महानगरपालिका हद्दीतील एक ते अकरा गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासास सिडको सकारात्मक

मुंबई : पनवेल महानगरपालिका हद्दीतील सेक्टर एक ते अकरा क्रमांकाच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत

'थोरल्या बाजीरावांनी २० वर्षात ४१ लढाया जिंकल्या'

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांनी २० वर्षांत ४१ लढाया लढल्या आणि जिंकल्या. अपराजित राहिलेल्या थोरल्या बाजीराव