Dengue : डेंग्यूचा कहर सुरुच! एकाच गावात ३००हून अधिक रुग्णांना प्रादुर्भाव

आरोग्य यंत्रणेचा अलर्ट


कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस कोसळत असला तरीही वातावरणातील उष्णता कमी झाली नाही. या बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसला आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अशातच सध्या डेंग्यूने (Dengue) राज्यभरात थैमान घातले आहे.


पुणे, नाशिक, नागपूर, अमरावतीनंतर आता कोल्हापूरमध्येही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सातत्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून (Health Department) सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.



कोल्हापूरात ३०० हून अधिक रुग्ण


कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी गावात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. एकाच गावात तब्बल ३००हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे. प्रत्येक घरात २ ते ३ ग्रामस्थांना डेंग्यूची लागणी झाली आहे. हणमंतवाडी परिसरातील अनेक खाजगी रुग्णालयामध्ये ग्रामस्थांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान उपचारासाठी ग्रामस्थांची रुग्णालयात गर्दी झाली आहे. परंतु याबाबत जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.



अमरावतीत पाच दिवसात ६ रुग्ण


अमरावतीच्या अनेक भागात पाऊस बरसत आहे. पावसाळ्यामुळे अनेक भागांत पाणी साचून त्यातून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. अमरावतीमध्ये पाच दिवसात सहा डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. अमरावतीमध्ये २१ जून रोजी डेंग्यूच्या २ रुग्णाची नोंद करण्यात आली. तर २५ जून रोजी डेंग्यूच्या ४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नारिकांमध्ये खळबळ उडाली असून आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरवात केली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



'अशी' घ्या काळजी


वारंवार ताप येणे, थंडी भरून येणे, डोके दुखणे, हाडांचे दुखणे, उलट्या होणे, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, त्वचेवर लाल व्रण उठणे, ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीच डॉक्टरशी संपर्क साधावा, तसेच खिडक्यांना जाळ्या बसवून घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा, आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Comments
Add Comment

Jalgaon Crime : चारित्र्याचा संशय डोक्यात शिरला, नवऱ्यानं पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील वडगाव येथील एक महिला

Caste Verification Committee : आतापर्यंत केवळ ०.३० टक्के कुणबी जात वैधता प्रमाणपत्रे रद्द

जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द केल्याचा दावा फोल; जिल्हानिहाय आकडेवारीतून वस्तुस्थिती समोर मुंबई :

Teacher Recruitment 2026 : तरुणांसाठी खुशखबर! तब्बल 30 हजार शिक्षकांची भरती; 'या' पोर्टलवर सुरू झाली नोंदणी

शिक्षक पदाच्या भरतीसाठी थेट लिंक आणि अंतिम तारीख; संपूर्ण डिटेल्स येथे वाचा मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; फॉर्च्युनरचा अक्षरशः चुराडा, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी