Reliance Jioच्या युजर्सना मोठा झटका

मुंबई: देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लानच्या किंमतीत वाढीची घोषणा केली आहे. कंपनीचे नवे टेरिफ प्लान ३ जुलैपासून सुरू राहतील. कंपनीचा बेस प्लान आधी १५५ रूपयांचा होता जो वाढून आता १८९ रूपयांचा होईल. अशातच या दरात २२ टक्के वाढ झाली आहे.

रिलायन्स जिओने आपल्या १९ प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. यात १७ प्रीपेड आणि २ पोस्टपेड आहेत. येथे पहिल्यांदा जिओेने एअरटेलच्या आधी प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत.

Image

नव्या टॅरिफ प्लाननुसार आधी जे २८ दिवसांची व्हॅलिडिटी असलेला महिन्याचा प्लान १५५ रूपयांचा होता त्यासाठी आता १८९ रूपये मोजावे लागणार आहेत. २०९ रूपयांच्या प्लानसाठी २४९ रूपये, २३९ रूपयांच्या प्लानसाठी २९९ रूपये, २९९ रूपयांच्या प्लानसाठी ३४९ रूपये मोजावे लागतील.

२८ दिवसांच्या ३४९ रूपयांच्या प्लानमध्ये जिथे २.५ जीबी दर दिवसाला डेटा मिळत होता त्यासाठी आता ३९९ रूपये भरावे लागतील.तर ३९९ रूपयांच्या प्लानसाठी आता ४४९ रूपये भरावे लागतील. यात ३ जीबी डेटा दिला जातो.
Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील