OMG : अरे बाप रे! शालेय पोषण आहारात आढळली मृत चिमणी

पुरवठा धारकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


नागपूर : प्राथमिक शिक्षणाचे (Primary Education) सार्वत्रिकीकरण (Universalization) करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत 'शालेय पोषण आहार' (School nutrition) योजना राबविण्यात आली. २००८-०९ पासून राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही योजना लागू केली. मात्र या पोषण आहारात काही दिवसांपूर्वी अळ्या लागल्याची घटना समोर आली होती. अशातच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात चक्क मेलेली चिमणी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ३वर्षांच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जात होता. त्यातील नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यासोबत चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ होत असून त्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार (Poor Nutrition) देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


या घटनेनंतर शालेय मुलांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मृत पक्षी सीलबंद पाकिटात आला कसा? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांकडून पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.



पुण्यातील पोषण आहारात किडे व अळ्यांचा समावेश


पुण्यातही (Pune) अशाच एका घटनेने खळबळ उडाली आहे. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचे समोर आले आहे. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे शालेय पोषण आहाराच्या नावाखाली नेमके कोण कुणाचे पोषण करतेय, असा प्रश्न डोके वर काढत आहे.

Comments
Add Comment

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड