Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही!

चंद्रशेखर बावनकुळे यांचे विरोधकांवर जोरदार टीकास्त्र


२०२९ च्या निवडणुकीतही जनता एनडीएच्या पाठिशी राहणार


मुंबई : संजय राऊतांना आम्ही महत्त्व देत नाही. त्यांची कोणी दखलही घेत नाही. संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना फक्त माध्यमच महत्व देत आहेत. राऊतांचे बोलणे त्यांचे त्यांना लखलाभ आहे. राऊतांनी काय बोलावे यात मी पडत नाही, अशी बोचरी टीका भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह विरोधकांनाही खोचक टोला लगावला.


चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीनंतरचे चित्र स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांना महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले असता महायुती पक्की असून 'राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येईल', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आत्तापासून तयारी सुरु करण्यात येत आहे, असेही त्यांनी म्हटले.


त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना माध्यमच महत्व देत आहेत. राऊतांचे बोलणे त्यांना लखलाभ आहे. मात्र राऊतांना उत्तर देण्यासाठी भाजपाकडे वेळ नाही, त्यामुळे त्यांनी काय बोलावे यात मी पडत नाही' अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.



राज्यात पुन्हा डबल इंजिनचे सरकार येणार


पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात महायुती पक्की आहे. पुढील काळातही पक्कीच राहणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतू परंतू नाही. आमच्याकडून कधीच मोठा म्हणून लहान भावाला त्रास नाही. जे नेते काही बोलत असतील तर त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नेत्यांना समज द्यायला हवी.



२०२९ च्या निवडणुकीतही जनता एनडीएच्या पाठिशी


भाजपा कधीच पळ काढू शकत नाही. या निवडणुकीत देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ठामपणे उभी राहिली आहे. २०२९ च्या निवडणुकीतही देशाची जनता मोठे पाठबळ एनडीएच्या (NDA) पाठिशी उभी राहणार आहे.



मंत्रिमंडळाचा विस्तारीकरणाचा हक्क एकनाथ शिंदे यांनाच


राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्री शिंदे हे योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. राज्यातील भौगोलिक आणि १४ कोटी जनतेच्या फायद्यासाठी महायुतीतीतल तिन्ही घटक पक्षांच्या आमदारांना मंत्रिपदे मिळायला हवी. कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या पाहिजे, याबाबत केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेणार आहेत.


ज्या पक्षाचे नेते आपल्या नेतृत्वाला जागांबाबत मागणी करीत असतात किती जागा मान्य करायचा हा वरिष्ठांचा अधिकार आहे. कुठल्याही जागेसंदर्भातील चर्चा माध्यमांमध्ये मान्य होऊ शकत नाही, त्यासाठी तिन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन सन्मानजनक जागावाटप करावे आणि एकदिलाने आम्ही महायुती म्हणून सामोरं जाणार असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी म्हटले.

Comments
Add Comment

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य