नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपाला (BJP) झटका सहन करावा लागल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhanparishad Election) दृष्टीने भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी काल रात्री राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे देखील आता समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत विधानपरिषदेच्या जागांवरील (VidhanParishad Election 2024) उमेदवारांबाबत चर्चा झाली. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. भाजप (BJP) पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मात्र, यासाठी भाजपमधील ३५ जण इच्छूक उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवारांची निवड करायची, हा पेच भाजप नेतृत्त्वासमोर आहे. यादृष्टीने दिल्लीतील बैठकीत फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड करताना भाजपकडून काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो किंवा जे उमेदवार विधानसभेला प्रभाव टाकू शकतात, अशांनाच भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेसोबतच मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अचानक दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे सांगितले जाते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…