'आणीबाणी'वरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्‍लाबोल!

नवी दिल्ली : उद्या २५ जून आहे. हा दिवस भारतीय लोकशाहीवरील काळा डाग असून, भारताच्या लोकशाहीला लागलेल्या डागाला उद्या ५० वर्ष पूर्ण होत आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून हल्‍लाबोल केला.


आज १८व्‍या लोकसभेच्‍या पहिल्‍या अधिवेशनापूर्वी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, आणीबाणी काळात भारतीय राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली. राज्यघटनेचा प्रत्येक भाग फाडला गेला. देशाचे रुपांतर तुरुंगात झाले. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली. या प्रकाराला भारताची नवीन पिढी कधीही विसरणार नाही.


आपल्या राज्यघटनेचे रक्षण करताना, भारतातील लोकशाहीचे, लोकशाही परंपरांचे रक्षण करतानाच, ५० वर्षांपूर्वी घडलेले असे कृत्य भारतात पुन्हा करण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा संकल्प देशवासीय घेतील. भारतीय राज्यघटनेच्या निर्देशानुसार आम्ही सामान्य लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करू, असेही पंतप्रधान मोदी म्‍हणाले.


देश आणि तेथील लोकांची सेवा करण्यासाठी सरकार सर्वांना सोबत आणण्याचा नेहमीच प्रयत्न करेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचवेळी विरोधकांनाही त्यांनी कठोर संदेश दिला. "भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे; लोकांना घोषणाबाजी नको, वस्तुस्थिती हवी आहे; त्यांना वादविवाद, परिश्रम हवे आहेत, नाटक आणि संसदेत व्यत्यय नको. मला आशा आहे की विरोधक लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरतील," असे ते म्हणाले.


देशाला खासदारांकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आणि त्यांनी जनतेच्या हितासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदनही केले.

Comments
Add Comment

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल