Laxmikant Dixit : रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अनेक दिवसांपासून आजारी; वाराणसीमध्ये सुरु होते उपचार


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित (Laxmikant Dixit) यांचे आज सकाळी पावणेसात वाजता निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर वाराणसीमध्ये (Varanasi) उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने काशीसह (Kashi) संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.


पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांची अंतिम यात्रा त्यांच्या मंगळागुरी या निवासस्थानापासून सुरू होणार आहे. तर त्यांच्या पार्थिवावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



कोण होते लक्ष्मीकांत दीक्षित?


रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात लक्ष्मीकांत यांचा पुजाऱ्यांच्या संघात समावेश होता. राम मंदिराच्या अभिषेकात त्यांनी १२१ पुरोहितांचे नेतृत्व केले होते. लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महावि‌द्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते. त्यांना काशीतील यजुर्वेदाचे महान विद्वान म्हणून ओळखले जात होते. त्यांची भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेवर नितांत श्रद्धा होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही दीक्षित घराण्याच्या जुन्या पिढ्यांचे योगदान असल्याचे सांगितले जाते.



उपासना पद्धतीतही पारंगत


लक्ष्मीकांत दीक्षित हे यजुर्वेदाचे उत्तम अभ्यासक असण्यासोबतच उपासना पद्धतीचेही जाणकार मानले जात होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी काशी येथे स्थायिक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती.

Comments
Add Comment

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार