Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीKalki 2898 AD : प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी' चा परदेशात धुमाकूळ!

Kalki 2898 AD : प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ चा परदेशात धुमाकूळ!

प्रदर्शित होण्याआधीच विकली ५५,५५५ तिकीटे

वॉशिंग्टन : ‘कल्की २८९८ एडी’ (Kalki 2898 AD) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांकडून चित्रपटाचे देश परदेशात देखील मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले जात आहे. काही दिवसांत हा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज होणार आहे. मात्र या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच एक मोठा टप्पा गाठला आहे. चित्रपट भारताबाहेर जास्तीत जास्त प्रेक्षकांना पाहता यावा यासाठी चित्रपट निर्माते अथक प्रयत्न करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच उत्तर अमेरिकेत चाहत्यांकडून मोठ्या जोमाने तिकीटे बुक केली जात आहेत. त्यामुळे या चित्रपटाने अमेरिकेत चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपट देशातील तसेच परदेशातही लोकांना मोठ्या प्रमाणावर पाहता येईल, यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत. उत्तर अमेरिकेत प्रभासच्या चित्रपटाचे प्री-बुकिंग (Pre Booking) सुरू झाले असून तिकीटे धडाधड विकली जात आहेत. रिलीज होण्यापूर्वीच ‘कल्की २८९८ एडी’ची ५५,५५५ तिकिटे विकली गेली आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर निर्मात्यांना आनंद अनावर झाला आहे. तर सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा शिल्लक आहे, त्यामुळे हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता निर्मात्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, २७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नाग अश्विन यांनी दिग्दर्शन केले आहे. तर वैजयंती मुव्हीज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कमल हासन आणि दिशा पटानीसह अनेक कलाकार ‘कल्की २८९८ एडी’मध्ये दिसणार आहेत. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहण्याची सर्वांना उत्सुक्ता लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -