Viral reels : जीव धोक्यात घालून रील्स बनवणाऱ्या ‘त्या’ तरुणांना पोलिसांचा चाप!

Share

आत्महत्येचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता

पुणे : अल्पवयीन तरुणांकडून (Minors) वाढत चाललेली गुन्हेगारी (Crime) सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच तरुणांनी जीव धोक्यात घालून, स्टंटबाजी करत केलेल्या रील्समुळे (Viral reels) तर वातावरण चांगलंच तापलं आहे. सोशल मीडियावर (Social media) लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादापायी हे तरुण स्वतःच्या जीवाची पर्वाही करत नाहीत. पुण्यातून देखील असाच एक स्टंटबाजीचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्राचा हात पकडून उंच कड्यावरुन लटकताना दिसत आहे. या दोघांचं नाव माहित पडलं असून पोलिसांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

व्हायरल रील ही पुण्यातील नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळील आहे. या व्हिडीओमधील तरुणाचं नाव मिहीर गांधी तर तरुणीचं नाव मीनाक्षी साळुंखे आहे. दोघेही अॅथलेट आहेत. रील व्हायरल झाल्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली. यानंतर या दोघांवर आत्महत्येचा प्रयत्न (Attempt to Suicide) केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

हा व्हिडीओ एप्रिल महिन्यातील असल्याचं या दोघांनी सांगितलं आहे. दोघांना पोलीस स्टेशनला बोलावून पोलिसांनी त्यांना समज दिली. काल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर मीनाक्षी साळुंखेच्या सोशल मीडिया अकाउंटवर असेच स्टंट करतानाचे व्हिडिओ आहेत. पोलिस त्याचाही तपास करत असून न्यायालयाच्या परवानगीने या दोघांवर कलम ३०८ अर्थात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

सामान्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारी रील

या व्हिडीओमध्ये उंच कड्याला केवळ मित्राच्या हाताच्या आधारावर लटकणारी मुलगी पाहून सामान्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे लाईक्स आणि व्ह्यूजसाठी नवी पिढी करत असलेला प्रकार पाहून सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. रिल बनवण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष द्या, असं आवाहन पालकांनी केलं आहे. असं असलं तरी सोशल मीडियाचा अतिवापर हा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

Recent Posts

Prakash Mahajan : ‘या’ महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका!

मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी मुंबई : राज्य सरकारने (State Government) 'माझी लाडकी बहीण'…

1 hour ago

Ambadas Danve : काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंची वरिष्ठांकडून कानउघडणी!

अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी मुंबई…

2 hours ago

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

2 hours ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

3 hours ago