Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीVat Purnima 2024 : वटपौर्णिमेला 'या' मुहूर्तावर पूजा करा अन्यथा पुढच्या जन्मी...

Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला ‘या’ मुहूर्तावर पूजा करा अन्यथा पुढच्या जन्मी मिळेल भलताच नवरा!

जाणून घ्या वटपौर्णिमेचे महत्त्व, मुहूर्त आणि वैशिष्ट्य

मुंबई : दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी महिलावर्ग वटपौर्णिमेचा उपवास करतात. मात्र अजूनही अनेकांना या दिवसाचे पारंपरिक महत्त्व आणि त्यामागची नेमकी कथा काय आहे हे माहीत नसते. त्याचबरोबर यंदा वटपौर्णिमा कधी यावरुनही गोंधळ निर्माण झाला आहे. जाणून घ्या याच संदर्भातील अधिक माहिती.

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

  • वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त २१ जून २०२४ रोजी सकाळी ६ वाजून १ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर २२ जून रोजी सकाळी ६ वाजून ३७ मिनिटाला तिथी समाप्त होणार आहे.
  • या पौर्णिमेला पहाटे स्नान करणे आणि दान करण्यास अधिक महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पूजेची वेळ सकाळी ७.३१ वाजेपासून ते सकाळी १०.३८ वाजेपर्यंत असणार आहे.

वटपौर्णिमेचे वैशिष्ट्य

  • सामान्यतः जून महिन्यामध्ये ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा येते, यास वटपौर्णिमा असेही म्हणतात.
  • या दिवशी लक्ष्मी नारायणच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याची पूजा करतात.
  • वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जातात.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते?

पौराणिक कथेनुसार, देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवी सावित्रीची पवित्रता आणि पतिव्रता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले. याबरोबरच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरण पावणार नाही तो दीर्घायुष्य जगेल, असे वरदान त्यांनी दिले. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते.

वटपौर्णिमेच्या दिवशी ‘या’ चुका करू नका

  • वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये, त्याची फांदी तोडू नये. जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजे आजच फांदी तोडून घरी आणा.
  • वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. कारण, या दिवशी काळ्या रंगाचे तसेच निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. तसेच विवाहीत महिला या दिवशी लाल, हिरवा, पिवळा अशा शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतात.
  • वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नका. या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका.
  • गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -