ENG vs WI: सॉल्टच्या वादळासमोर वेस्ट इंडिजची शरणागती, १८व्या षटकांतच इंग्लंडचा विजय

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर ८ विकेट राखून विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने हे आव्हान ८ विकेट राखत पूर्ण केले.


सलामीवीर फिल सॉल्टच्या नाबाद ८७ धावा तसेच जॉनी बेअरस्ट्रॉच्या नाबाद ४८ धावांच्या जोरावर इंग्लंडने हे आव्हान १७.३ षटकांत पूर्ण केले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने २५ धावा केल्या. तर मोईन अलीला १३ धावा करता आल्या.


सॉल्ट आणि बेअरस्ट्रॉने जबरदस्त फटकेबाजी करताना इंग्लंडला हा विजय साकारून दिला. वेस्ट इंडिजचे गोलंदाज मात्र विकेट मिळवण्यात अयशस्वी ठरले.


वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचा संघ सुपर ८ मध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला १८ धावांनी हरवले. प्रत्येक ग्रुपमध्ये ४ संघ आहेत. या ग्रुपमधील दोन अव्वल संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.



१० षटकांत ठोकल्या ८२ धावा


इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध सुपर ८च्या सामन्यात पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरतोय की काय असे वाटत होते. कारण त्यावेळेस वेस्ट इंडिजने १० षटकांत विकेट न गमावता ८२ धावा ठोकल्या होत्या.


वेस्ट इंडिज ज्या वेगाने धावा करत होता त्यामुळे ते २००चा आकडा पार करतील असे वाटत होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी खेळाच्या दुसऱ्या हाफमध्ये कॅरेबियन फलंदाजांवर लगाम लावला. यामुळे त्यांना २० षटकांत १८० धावा करता आल्या.

Comments
Add Comment

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील

T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले