Chandrashekhar Bawankule : ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा गंभीर आरोप


मुंबई : सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन तापातापीचं वातावरण पाहायला मिळत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. 'मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही', असं विधान त्यांनी केलं होतं. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) माध्यमांशी संवाद साधताना 'ठाकरे-पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत', असा गंभीर आरोप त्यांनी केला.


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'केंद्र सरकारचा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे? याचा राज्याशी संबंध आहे. राज्याची भूमिका आहे. राज्याने निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही एवढे दिवस सत्तेत होता. शरद पवार यांची नेहमी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका राहिली आहे, हे लपून नाही आहे. त्यांच्या सरकारमधील जीआर पाहिले तर त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आले असते. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांसारख्या सवलती देता आल्या असत्या. पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार बोलत आहे हे आश्चर्य आहे.'


चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही, योग्य वकील लावले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण गेले. जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीसांनी दिले. आता तुम्ही बोंबा मारत आहात त्या कुठल्या अधिकाराने मारत आहात? मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारे आमचे महायुतीचे सरकार आहे.'



मविआ विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही


पुढे ते म्हणाले, 'हे सकाळचे भोंगे आहेत आणि ३ पार्ट्या महाविकास आघाडी आहेत. हे फक्त लोकांना संभ्रमित करून विकासापासून दूर नेत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलत नाही. एवढे मोठे निर्णय केंद्र सरकारने केले आहेत त्यावर सरकारचे अभिनंद करणार नाही. सरकारला कुठल्याही गोष्टीचे क्रेडिट देणार नाहीत. मात्र लोकांना डायवर्ट करत आहेत. मीडियाच्या माध्यमातून विकासाची कामं डायवर्ट करत आहेत. महाराष्ट्राचे हित विकासावर आहे.', असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी