Tuesday, October 8, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेTogo Van : ओवळा-माजिवडा मतदारसंघात ५० व्हॅन मिळणार

Togo Van : ओवळा-माजिवडा मतदारसंघात ५० व्हॅन मिळणार

ठाणे : ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची (Disposal of waste) जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून दोन टोगो व्हॅन (Togo Van) यापूर्वीच शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे.

ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय. कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदार संघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर (Dumping ground) जाणार नाही.

कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असे त्याचे वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल. यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येतेय. या टोगो व्हॅन मध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा केला जातो. त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते. प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून, आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्येक्षिक मंगळवारी पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत. भविष्यात ओवळा माजिवडा मतदारसंघासाठी ५० व्हॅन देणार आहेत. जेणेकरून कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही.

कचऱ्याचे खतात रूपांतर झाल्याने मतदारसंघातील जी उद्याने आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडे आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लॅण्डस्केप केलेले आहेत, तिथे खताचा (Fertilizer) पर्यावरणसुलभ वापर करता येईल. तसेच मोठ्या मध्यवर्ती भागामध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता. त्यामधून ह्या दोन टोगो व्हॅन घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून, राज्यात असा प्रकल्प पहिल्यादांच होतो आहे, अशी माहीती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -