भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख भिवंडीकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीकरिता भाडेपट्ट्याने जमीन देण्यासंबंधीचे सर्व अडथळे बृहन्मुंबई महानगरपालिका पुढील १० दिवसांत दूर केले जातील असे आश्वासन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले, अशी माहिती भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली. विशेष म्हणजे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीला आमदार रईस शेख, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर, उपमहापौर तारिक मोमीन, भिवंडी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संदीप पटनवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात आमदार शेख यांनी सांगितले की, भिवंडी महानगरपालिकेने यापूर्वी मुंबई शहर पाणीपुरवठा प्रकल्पात सहकार्य केले होते. आता, भिवंडी महानगरपालिकेला पाईपलाईनसाठी जमिनीची गरज आहे, जी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे. जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जमीन भाडेपट्ट्यावर घेताना येणाऱ्या अडथळ्यांवर बैठकीत चर्चा झाली. जमिनीचा प्रस्ताव २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सादर करण्यात आला.
नवी दिल्ली : इराणमधील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर संकट निर्माण झाले आहे. भारत आणि चीन ...






