GCT : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे नरडाणा येथे गती शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल

  42

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबई (Mumbai) विभागाने धुळ्याजवळ नरडाणा येथे नुकतेच पहिले गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल सुरु केले. शिरपूर पॉवर प्रा.लि.च्या सहकार्याने हे कार्गो टर्मिनल (Gati Shakti Cargo terminals) कार्यान्वित झाले. हे मुंबई विभागातील पहिले कार्गो टर्मिनल आहे. जिंदाल पॉवर लिमिटेडच्या धुळ्यातील पॉवर प्लांटची स्थापित क्षमता हि ३०० मेगावॅट आहे आणि टिपलर हाताळणी सुविधेसह ३ लाइन हाताळणी यार्डसह सुसज्ज आहे.


नरडाणाजवळ हे गतिशक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल सुरू झाल्यामुळे २. ०५ दशलक्ष टन लोडिंग आणि मालवाहतूक अंदाजे भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये दरवर्षी ३७४ कोटींची भर पडणार आहे. सध्याच्या रस्त्याने कोळशाच्या वाहतुकीची जागा रेल्वेने घेतली जाईल, ज्यामुळे रेल्वे गुणांक आणखी वाढेल, वाहतुकीचा एक पर्यावरणपूरक मार्ग उपलब्ध होईल आणि साल २०३० पर्यंत 'मिशन ३ हजार मॅट्रिक टन साध्य करण्यासाठी हे एक मोठे पाऊल ठरेल .


अभिषेक पुढे म्हणाले की मुंबई विभागाच्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोनामुळे या गती शक्ती टर्मिनल लवकर सुरू करणे शक्य झाले आहे. यासह,गती शक्ती टर्मिनलमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातून पहिली रेल्वे गाडी मिळाली जिच्यावर १६ जून रोजी माल भरण्यात आला आणि १८ जून रोजी नरडाणा येथील गति शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलवर ठेवण्यात आला.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता