PM Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा, शेतकरी संमेलन, गंगा आरती आणि बरंच काही...

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित आहे. ते मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता वाराणसीच्या एअरपोर्टवर पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरमधून मेहंदीगंज सभेच्या ठिकाणी पोहोचतील.


यातील किसान संवाद कार्यक्रमात दे देशातील ९.६० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी अंतर्गत २० हजार कोटीहून अधिक पीएम किसान सन्मान निधी योजना जारी करतील. हा १७वा हप्ता अशेल. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यावेळेस ते प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतील.


या दर्यान सर्व शेतकरी भगव्या टोपीत दिसतील. शेतकरी आणि महिला समूहांना ३०० घरे देतील. १६७ शेतकरी सखींना प्रमाणपत्र देतील. या महिला ऑरगॅनिक शेती करतात. या दरम्यान मिनी रोड शोची एक झलक दिसेल. संपूर्ण रस्त्यावर पंतप्रधनांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी पुन्हा एकदा वाराणसीकर उत्सुक झाले आहे. याची पहिली झलक वाराणसीच्या नमो घाटावर पाहता येऊ शकते. येथील व्हिज्युअल आर्ट्सच्या विद्यार्थ्याने वाळूने पंतप्रधान मोदींचा सुंदर फोटो बनवला आहे. तसेच रंगही भरले आहेत. वाराणसीच्या भाजपाच्या काशी प्रांताचे अध्यक्ष दिलीप पटेल यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींचे स्वागत ऐतिहासिक असेल.

Comments
Add Comment

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर