
मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले. एनडीचे सरकार बनल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
गंभीरने अमित शाहा यांना निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर आपल्या आणि अमित शहा यांच्या भेटीचे फोटो शेअर केले तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात भारत सुरक्षेच्या बाबतीत आणखीन सुधारेल आणि देशात स्थिरता वाढेल.
गौतम गंभीरने राजकारण सोडले?
गौतम गंभीरने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार म्हणून दिल्ली येथून निवडणूक लढवली होती. गंभीरने त्यावेळेस आम आदमी पक्षाच्या आतिशी मार्लेना यांना ६,९५,१०९ मतांच्या फरकाने हरवले होते. आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर या माजी क्रिकेटरने २ मार्च २०२४ला घोषणा करताना सांगितले की तो राजकारणातून बाहेर होत आहे. तसेच पुढे केवळ क्रिकेटच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष देईल.
Met with Hon’ble HM Shri @AmitShah Ji to congratulate him on recent electoral success. His leadership as the Home Minister will further strengthen the security and stability of our nation! pic.twitter.com/IvjqFopaFC
— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 17, 2024
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार?
गौतम गंभीर सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे. दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच बनणार असल्याचे सांगितले जात आहे.