रत्नागिरी : सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या (collapse) घटना घडत आहेत. त्यातच काल दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या पावसामुळे अणुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळल्याची (Anuskura Landslide) माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर भलेमोठे दगड येऊन पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातून अणुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि दरड हटवण्याचे काम सुरू केले.
दरड कोसळण्याची घटना घडताच तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू केले. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीन देखील मागवण्यात आली होती. मात्र रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे आज पहाटेपासून पुन्हा दरड हटवण्याचे काम सुरू केले असल्याचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अणुस्कुरा घाट अतिशय महत्वाचा मानला जातो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील वाहने या घाटातून धावतात. याशिवाय मुंबईहून-गोवा तसेच सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी वाहने अणुस्कुरा घाटातून जातात. वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या या घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली असून प्रवाशांचा खोळंबा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…