Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीRaj Thackeray : मराठी माणसाच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग; जनता मनसेची वाट...

Raj Thackeray : मराठी माणसाच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग; जनता मनसेची वाट पाहतेय!

कार्यकर्त्यांना संबोधित करताना काय म्हणाले राज ठाकरे?

मुंबई : लोकसभेत (Loksabha) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेसाठी (Vidhansabha) मात्र मनसे (MNS) स्वबळावर लढणार असल्याची चिन्हे आहेत. आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे मनसेने महाराष्ट्रात चाचपणी सुरु केली आहे. विधानसभेसाठी मनसे २००-२५० जागांची तयारी करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) सडकून टीका केली.

उद्धव ठाकरेंना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, झालेलं मतदान हे मराठी माणसाचं नाही. त्यांना वाटत असेल की, आपल्याला मतदान झालं आहे. मात्र, तसं झालेलं नाही. उद्धव ठाकरेंना जे मतदान झालं आहे ते मोदी विरोधातील मतदान आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही राग आहे. त्यामुळे जनता मनसेची वाट पाहत आहे. २०० ते २२५ जागांवर आपण तयारी करत आहोत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असेल, यांच्यातच काही जागावाटप ठरत नाही. मी सुद्धा जागा मागायला जाणार नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मतदारसंघनिहाय आढावा घेण्याकरत टीम्स तयार करणार

पुढे ते म्हणाले की, युती आघाडीबाबत लक्ष देऊ नका. विधानसभेत जी भूमिका असेल ती मी योग्यवेळी तुमच्यासमोर मांडणार आहे. पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जाणार आहे ती त्यांनी लवकरात लवकर देणं क्रमप्राप्त असणार आहे. दरम्यान मतदारसंघ आढावा घेण्यासाठी कोण टीम असतील हे तुम्हाला सांगितलं जाईल. ते त्यांचं काम करतील आणि रिपोर्ट देतील असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -