Nagpur Blast : नागपुरात अग्नितांडव! स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट

६ जणांचा मृत्यू तर चार ते पाच जण गंभीर जखमी


नागपूर : डोंबिवली एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील भीषण आगीची घटना ज्वलंत असतानाच नागपूरमध्येही मोठा स्फोट (Nagpur Blast) झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. नागपूरच्या धामणा येथील चामुंडा (Chamunda) कंपनीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा तहसीलच्या धामणा येथील चामुंडा नावाच्या कंपनीत स्फोटकांशी संबंधित सर्व कामे केली जातात. आज दुपारी १च्या सुमारास पॅकेजिंग विभागात आग लागल्याची माहिती आली होती. त्यानंतर काही वेळातच या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी कंपनीमध्ये १० कामगार काम करत होते. हा स्फोट इतका भीषण होता की काम करणाऱ्या १० पैकी सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून इतर चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि हिंगणा पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. जखमींना तातडीने नागपूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आले नाही.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी