Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीBOB Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, या तारखेआधी करा अप्लाय

BOB Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, या तारखेआधी करा अप्लाय

मुंबई: बँकेत नोकरी शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदाकडून अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती अभियासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरून अर्ज करू शकता. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै २०२४ देण्यात आली आहे.

या भरती अभियानांतर्गत अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. यात एकूण ६२७ जागांवर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अभियानांतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेची ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन चेक करू शकतात.

वय

यासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय २४ वर्षे ते ४५ वर्षादरम्यान असले पाहिजे. दरम्यान आरक्षित वर्गासाठी सूट देण्यात आली आहे.

किती आहे फी

यासाठी अर्ज करताना उमेदवाराला आवेदन शुल्क भरावे लागेल. सामान्य उमेदवारांसाठी ६०० रूपये शुल्क आहे तर एससी, एसटी, पीडब्लूडी आणि महिला उमेदवारांसाठी १०० रूपये शुल्क द्यावे लागेल.

अर्ज दाखल करण्यासाठी तारीख १२ जून २०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २ जुलै २०२४

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.

त्यानंतर होमपेजवर संबंधित अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

उमेदवारांनी योग्य ते डिटेल्स भरावेत.

उमेदवारांनी योग्य ती कागदपत्रे अपलोड करावीत.

यानंतर उमेदवाराला परीक्षा शुल्क भरावे लागेल.

त्यानंतर अर्ज सबमिट करा.

आता अर्जपत्र डाऊनलोड करून घ्या.

उमेदवारांनी या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -