सोलापूर : विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी. पूर्व ‘पेट’ परीक्षा (Phd Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती दिली आहे. सोलापूर (Solapur) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar University) यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशासह परदेशातील कोणत्याही विद्यार्थ्याला आता घरबसल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पेट’ देता येणार आहे. (Online Exam)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी ‘पीएच.डी.’ च्या जवळपास ४७४ जागा असणार आहेत. ‘पीएच.डी’ पूर्वीची पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याची लिंक खुली असणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, पेट परीक्षेत दोन पेपर असतात. त्यामध्ये सकाळी रिसर्चचा पेपर तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अॅन्ड्राईड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही देता येणार आहे. मात्र कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. हा पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे. तर १८ ते २० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात येणार असल्याचे, विद्यापीठाने सांगितले आहे.
दरम्यान, एका विषयातून पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ जुलैला परीक्षा देता येणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची परीक्षा २२ जुलैला होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…