Jalna news : घरकुल योजनेत घर न मिळाल्याने जालन्यात तीन तरुणांचे धक्कादायक कृत्य!

Share

हातात डिझेलच्या बॉटल्स घेऊन जिल्हा परिषदेसमोरच केलं असं काही…

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे जालना (Jalna news) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यातच आज जालन्यात घडलेल्या एका धक्कादायक कृतीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रमाई आवास घरकुल योजनेत (Ramai Awas gharkul yojana) घर न मिळाल्यामुळे तीन तरुणांनी जालना जिल्हा परिषदेसमोरच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना अडवल्यामुळे अनुचित प्रकार होता होता टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील या तरुणांनी हातात डिझेलच्या बॉटल्स आणि ज्वलनशील पदार्थ आणले होते. ते त्यांनी स्वतःच्या डोक्यावर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणांच्या हातातील बॉटल्स हिसकावून घेत त्यांना अडवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव गावातील ३२ जणांना रमाई आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मिळाले आहे. मात्र, या तीन तरुणांना ते मिळालेले नाही. त्यांनी आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यातूनच त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

युवक काय म्हणाले?

झाल्या प्रकाराबाबत संतप्त होत तरुणांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, चार वर्षे झाली, तेव्हापासून अर्ज भरत आहोत. दरवेळी पुढील फेरीत घर मिळेल, असं सांगितलं जातं. आम्ही उसतोडी करतो. यावेळी ३२ जणांना लाभ मिळाला आहे. अनेक जणांना दोन-दोन घरं मिळाल्याचं या युवकांनी म्हटलं आहे. आम्हाला गेल्या ४ वर्षापासून फक्त वेगवेगळ्या कार्यालयात अर्ज करण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं या युवकांनी म्हटलं आहे.

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

17 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

41 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

2 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

2 hours ago