Maharashtra Rain : पावसाचे थैमान! राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढला आहे. पहाटेपासून हजेरी लावलेल्या पावसाने ठिकठिकाणी थैमान घातले आहे. पहिल्याच पावसामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली असली तरीही नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान विभागाकडून (IMD) पुढील काही दिवस मुंबईकरांचा दिलासा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पहाटे ४ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबई शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. अशातच हवामान विभागाने राज्यात पुढचे पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिला असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आले आहे.



या भागांत पावसाची शक्यता


कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आली आहे.



'या' जिल्ह्यात पावसाचा अलर्ट


भारतीय हवामान खात्याने सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. अंदाजनुसार ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबत हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्लाही भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी