Belgaon news : बेळगावच्या घटप्रभा नदीत १३ जणांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली!

१२ जण बचावले तर एकजण वाहून गेला


बेळगाव : गेल्या काही दिवसांत बुडण्याच्या घटनांमध्ये (Drowning) प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता बेळगावमधूनही (Belgaon) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. बेळगावच्या घटप्रभा नदीत (Ghatprabha River) १३ प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolley) उलटल्याची घटना घडली आहे. यापैकी बारा जण बचावले असून एक जण पाण्यातून वाहून गेला. त्याचा शोध सुरु आहे. कुलगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.


बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील आवरादी गावाजवळ १३ जणांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली घटप्रभा नदीत उलटली. ट्रॅक्टरमधील प्रवासी आवरादी येथून नांदगाव येथे मजुरीसाठी निघाले होते. घटप्रभा नदी ओलांडून दररोज हे मजूर कामावर जात. मात्र, आज ही दुर्घटना घडली.


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं. या दुर्घटनेतील १२ जण बचावल्याची माहिती असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे. पोलिसांनी नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. प्रशासन बचावकार्यात गुंतलेलं आहे. कुलगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.



बेळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी


दरम्यान, बेळगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. बेळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे अनेक भागात, घरात आणि दुकानात पाणी शिरले. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे गुरुवारी रात्री ढगफुटी होऊन पाऊस झाल्याने श्री यल्लमा देवीच्या मंदिरात देखील पाणी शिरले.

Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक