Surendra Agarwal : धनिकपुत्राच्या आजोबाच्या अडचणीत वाढ! अनधिकृत MPG क्लबवर बुलडोझर

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते कारवाईचे आदेश


सातारा : पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेमुळे (Pune Porsche Car Accident) अख्ख्या राज्याचं वातावरण तापलं होतं. या मुलाला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कशी कामाला लागली होती, याची उदाहरणे वारंवार समोर येत होती. या प्रकरणात त्याचे आईवडील व आजोबाही तितकेच दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली. मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांच्याबाबत तर सातत्याने त्यांचा काळा कारभार समोर येत आहे.


सुरेंद्र अगरवालचा महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनियमितता आढळल्यास बुलडोझर चालवण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी दिले होते. यानंतर आता सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.


सुरेंद्र अगरवालच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारचा परवाना रद्द करत बार सील केला होता. अग्रवाल कुटुंबियांच्या मालकीचे महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवावा असा थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. यानंतर आठ दिवसांच्या आत ही कारवाई करण्यात आली आहे.



सुरेंद्र अग्रवालवर आणखी कोणते आरोप?


चालकाला डांबून ठेवणे, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा सुरेंद्र अग्रवालने नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारीला धमकावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप सुद्धा आहे.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे