नाशिक : राज्यभरात अपघाताच्या (Accident News) सत्रात सातत्याने वाढ होत असताना नाशिकमधूनही (Nashik) एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल बस व ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ हा भीषण अपघात झाला. जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत होते. दर्शनावरुन परत येताना देशमाने गावाजवळ हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक आणि बस समोरासमोर धडक देऊन रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमी झालेल्या रुग्णांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…