जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीतच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार होते. येत्या शनिवारपासून ते आमरण उपोषण करणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगेंना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारण्यामागची काही कारणेही समोर आली आहेत.
ज्या गावातून मराठा आंदोलनाचा वणवा राज्यभरात पेटला त्या अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच काही दिवसांपूर्वी जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला होता. तसे निवेदनच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले होते. या निवेदनात ‘गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये’, अशी मागणी केली होती. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला. निवेदनावर ७० गावकऱ्यांच्या सह्या असल्याने जरांगे यांचं उपोषण वादात सापडलं. पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं हे एक कारण आहे.
यासोबतच ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेची कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…